Tiranga Times

Banner Image

विजय हजारे ट्रॉफी 2025 मध्ये टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्माने दमदार पुनरागमन करत पहिल्याच सामन्यात शानदार शतक झळकावले, मात्र दुसऱ्या सामन्यात त्याची कामगिरी निराशाजनक ठरली.

rohit-sharma-vijay-hazare-2025-century-golden-duck-tiranga-times-maharastra
  • By Tiranga Times Marathi
  • Reported By: Admin
  • Updated: December 26, 2025

Tiranga Times Maharastra

 

पहिल्या सामन्यात सिक्किमविरुद्ध रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी करत अवघ्या 62 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले आणि 94 चेंडूंमध्ये 155 धावांची तुफानी खेळी साकारली. या डावात त्याने अनेक चौकार आणि षटकारांची बरसात करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

मात्र दुसऱ्या सामन्यात उत्तराखंडविरुद्ध रोहितकडून अशीच फलंदाजी पाहायला मिळेल, अशी अपेक्षा असताना तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. ‘हिटमॅन’ गोल्डन डकवर बाद झाल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला.

जयपूरमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात रोहितची खेळी चर्चेचा विषय ठरली होती. मात्र लगेचच आलेल्या दुसऱ्या सामन्यातील अपयशामुळे क्रिकेटमध्ये चढ-उतार कसे असतात, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.

 

 

#TirangaTimesMaharastra
#RohitSharma
#VijayHazareTrophy
#IndianCricket
#CricketNews
#SportsMarathiNews

Breaking News:

No Record Found ❗

Recent News: